जगात काही देशांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे मोठी हानी झाली आहे. अनेक लोकांनी आपले जीव गमवले आहेत. युद्ध हे कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही असे भारताने अनेक वेळा म्हटले आहे. कोणतीही गोष्ट ही बसून चर्चा करुन सोडला पाहिजे अशी भूमिका भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अनेकदा मांडली आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही शांत होताना दिसत नाहीये. दुसरीकडे इस्रायल आणि लेबनॉनमधील संघटना यांच्यात युद्ध सुरु आहे. इस्रायल हमास आणि हिजबुल्लाह या दोन्ही दहशतवादी संघटनासोबत लढत आहे. मध्ये मध्ये इतर देशांमध्ये ही वाद होत आहे. इराणने देखील इस्रायलच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे जगात अशांतता आहे. इतर देश यामुळे चिंतेत आहे.
आता बिशप मायर मेरी इमॅन्युएल यांनी तिसरे महायुद्धाचे गंभीर परिणाम होणार असल्याचे भाकित केले आहे. त्यांची ही भविष्यवाणी जगासाठी चिंतेचं कारण बनली आहे. तिसरे महायुद्ध हे भयंकर आणि विध्वंस करणारं असेल. ज्यामध्ये जगातील एक तृतीयांश लोक मारले जातील असे त्यांचे म्हणणे आहे.
बिशप यांचा हा दावा इतका गंभीर आहे की, तो जर खरा ठरला तर त्याचे इतके वाईट परिणाम होतील याचा विचार ही कोणी करु शकणार नाही. तिसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर होईल असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला आहे.
इमॅन्युएल हे ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध बिशप आहेत. तिसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रांच्या वापर होईल असा दावा त्यांनी X वर केला आहे. ते म्हणाले की, अणुयुद्धामुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्या नष्ट होईल आणि मानवतेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी काळ असेल.
बिशप इमॅन्युएल यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, ‘तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांच्या वापरामुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाईल. उरलेल्या दोन-तृतीयांश लोकांना वाटेल की त्यांचा जन्म का झाला. हे खूप भितीदायक असेल, लवकरच आकाशात रॉकेट उडताना दिसतील. मानवजातीसाठी यात कोणतीही आशा दिसत नाही.
Bishop Mar Mari Emmanuel with a connection to the world! 🌎
No 1 tin prevention you but the Lord and Savior Jesus Christ of Nazareth.
Jesus Christ is the lone way, the truth, and the life. † pic.twitter.com/IETXRcmINB
— Real Media 🦅 (@LordOfPower) November 22, 2024
बिशप यांनी अण्वस्त्रांवरुन जगाला इशारा दिलाय की, अण्वस्त्रांचा वापर लवकरच दिसून येईल. हे जगासाठी एक आपत्ती म्हणून येणार आहे.
ख्रिश्चन धर्मगुरू इमॅन्युएल यांचे हे भाकीत अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेच्या फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने अणुहल्ला टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एजन्सीने शीतयुद्धाच्या काळाची आठवण करुन दिलीये. रशियाने जर अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला केला तर किती लोक मारले जातील हे यावरून कळतंय. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि वाढता तणाव यामुळे अणुयुद्धाची भीती वाढत आहे.