अंजनगाव सुर्जी बाजार समितीत लिलाव पद्धतीने कापूस खरेदी सुरु:कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पुढाकार

2 hours ago 1
अंजनगाव सुर्जी येथील कृषी ऊत्पन्न बाजार समीतीत लिलाव पद्धतीने कापूस खरेदी सुरु करण्यात आली. त्यामुळे जास्त बोली बोलणाऱ्याला कापूस विक्री केली जात असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला होता. त्याचा दृश्य फायदा दिसून येत आहे. अंजनगांवसुर्जी कृऊबासच्या संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी अशा पद्धतीने कापूस खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आजपासून बाजार समिती यार्डवर कापसाचा लिलाव सुरु झाल्याचे सभापती अॕड. जयंत साबळे व संचालक मंडळाने स्पष्ट केले. गेली बारा वर्षे तालुक्यातील उद्योजकांकडून (जिनींग-प्रेसींग ) परस्पर कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे जिनींग प्रेसींग व्यापाऱ्यांचे फावत होते. तर तिकडे आवक कमी दाखवून बाजार समीतीचा सेसही चुकवला जात होता. अशाप्रकारे या व्यवहारात सेस गळतीसह शेतकऱ्यांसोबतच बाजारसमीतीचेही नुकसान होत होते. दरम्यान आज दिवसभरात सात गाड्यांमधील कापसाची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आपला कापूस हा सर्वप्रथम बाजार समिती यार्डवर आणून त्याची नोंद करून टोकन घेऊन हर्रास करावा. त्यासाठी बाजार समितीची सौदापट्टी घेऊन गाड्या जिनिंगवर मोजमापाकरिता पाठवाव्या, असे आवाहन सभापती ॲड. जयंत साबळे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे. सीसीआयचीही ५१ गाड्यांची खरेदी एकीकडे बाजार समितीच्या यार्डवर लिलाव पद्धतीने खरेदी-विक्री सुरु झाली असतानाच याठिकाणी कापूस पणन महासंघातर्फेही (सीसीआय) कापसाची खरेदी केली जात आहे. दरम्यान दिवसभरात शेतमाल उत्पादकांनी या केंद्रावर ५१ गाड्यांमधील कापसाची विक्री केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article