शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत खोचक प्रश्न विचारत भाजपवर निशाणा साधला आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांची साउथच्या ब्रह्मासारखी अवस्था होती की काय ते बघा? जेव्हा जेव्हा भाजपच्या अंगावर येतं तेव्हा वारं झेलायला बावनकुळे आहेत की काय? मेवा खायच्या वेळेस मात्र तेच तेच चेहरे पुढे येतात. भाजपमध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत का पोहोचू शकत नाही? बावनकुळे साहेबांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी त्यांना का डावलले जात आहे याचा त्यांनी विचार करावा”, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
“ईव्हीएमबद्दलचा उद्रेक याच्याआधी कधीच झाला नव्हता, जो आता महाराष्ट्रात दिसून येत आहे. महायुतीने एवढा मोठा विजय मिळवला आहे. मात्र त्याचा विजयाचा जल्लोष कुठे दिसत नाही. अनेक ठिकाणी मतदानाची आकडेवारी मिस मॅच आहे. जिथे जिथे महायुतीच्या उमेदवारांनी रिकाउंटिंगची मागणी केली ती स्वीकारली गेली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराची रिकाउंटिंग मागणी स्वीकारली नाही. हा पक्षपातीपणा आहे. ईव्हीएम मशीनची याचिका जर कोर्टाने फेटाळून लावली तर शेवटचं आशा स्थान म्हणून आम्ही कोणाकडे पाहायचं?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
हे सुद्धा वाचा
‘बावनकुळे यांना मुख्यमंत्री पदासाठी का डावलले जात आहे?’
“हा सर्व खेळच खुर्चीचा आहे. पक्षपातीपणा केला जात आहे. यावेळेस मुख्यमंत्री पदाचे खरे हकदार देवेंद्र फडवणीस आहेत. भाजपमध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत का पोहोचू शकत नाही? चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी त्यांना का डावलले जात आहे? याचा त्यांनी विचार करावा”, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला.