Chikhli Police: आचारसंहिता संपताच चिखली ठाणेदार व मुख्याधिकारी आले ॲक्शन मोडवर

2 hours ago 1

आर बी फिटनेस क्लब मधील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड
डीपी रोडवरील अतिक्रमणही हटविले
डीपी रोड न घेतला मोकळा श्वास

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Chikhli Police) : दोनच दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि निवडणुकीची आचारसंहिता संपताच (Chikhli Police) चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर आले पोलिसांनी आरबी फिटनेस क्लब मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली तर पाठोपाठ डीपी रोडवरील अतिक्रमण हटविले मुख्याधिकारी यांनी सुद्धा आर बी फिटनेस क्लबला जागेचा दुरुपयोग होत असल्याने सील लावले आहे.

चिखली शहरातील जाफराबाद रोड वर असलेल्या एका व्यायाम शाळेमध्ये व्यायामाऐवजी जुगार खेळला जात असल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांना खबरी कडून मिळाली असता त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता यामध्ये नगरपालिकेचे माजी नगरसेवक अब्दुल रफिक ,श्रीकांत टेहरे यांच्यासह जितेंद्र राऊत, शंकर तायडे ,राजेंद्र जैन ,शिवाजी सुरडकर ,सुधीर गवई, परमेश्वर गवारे, संतोष जाधव, आजम खान ,जितेंद्र रुपारेलिया, कुणाल रूपारेलिया, मनोज रुपारेलिया शेख जमीर आधी जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतले त्यांच्याजवळून 41 550 रुपये नगदी व 73 हजार पाचशे रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

या सर्वांवर अ प क्रमांक 930 / 2024 कलम ४,५ मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या (Chikhli Police) घटनेचे फिर्यादी म्हणून ए एस आय राजेंद्र काळे यांच्या तक्रारीवरून वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे अटक करण्यात आलेल्या सर्वांना कारवाई करून सोडून देण्यात आले. या कारवाईमध्ये ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितीन चव्हाण एएसआय राजेंद्र काळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवई सागर कोल्हे राहुल पायघन प्रशांत धंदर सुनील केसकर माया सोनुने निलेश सावळे अधि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

मुख्याधिकारी प्रशांत बिडगर आले ॲक्शन मोडमध्ये

ठाणेदार संग्राम पाटील यांच्या कारवाईनंतर मुख्याधिकारी प्रशांत बिडगर सुद्धा ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी आरबी फिटनेस क्लब वर नगरपालिकेने दिलेल्या भूखंडाचा गैरवापर केल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने ती जागा सिल करून आपल्या ताब्यात घेतली मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की प्रल्हाद पद्मजी शर्मा यांच्या मालकीच्या लेआउट मधील शेत सर्वे क्रमांक १४६/१ मधील नगरपरिषदेचे आरक्षित भूखंड क्षेत्रफळ 1134 चौरस मीटर पैकी दहा टक्के जागा म्हणजे 13.45 चौरस मीटर जागा ही १४/९/२०२४ च्या सभेच्या अन्वये श्री व्यंकटेश बहुउद्देशीय सामाजिक क्रीडा व शिक्षण संस्था चिखली (Chikhli Police) यांना नऊ वर्षांकरिता व्यायाम शाळा या उपयोगासाठी उपलब्ध करून दिली होती परंतु सदर ठिकाणी काल पोलीस कारवाईमध्ये त्या ठिकाणी जुगार खेळताना काही ईसम आढळून आले आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे त्यामुळे सदर जागेचा होणारा दुरुपयोग बघता सदर ठराव हा रद्द करण्यात आलेला आहे आणि ती व्यायाम शाळा नगरपालिकेच्या ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी सिल लावण्यात आलेले आहे.

डीपी रोडने घेतला मोकळा श्वास…

चिखली शहरातील महत्त्वाचा असलेल्य डीपी रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होत होता. अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची रस्ता मोकळा करण्याची मागणी होती. निवडणुकीची आचारसंहिता संपताच (Chikhli Police) चिखली पोलिसांनी हा सर्व रस्ता मोकळा करून घेतल्याने जणू काही डीपी रोड ने घेतला मोकळा श्वास असेच म्हणावे लागेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article