श्री आदिनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थान रथयात्रा महोत्सव:श्री १००८ आदिनाथ भगवंतांच्या जयकारांनी दुमदुमली भातकुली
2 hours ago
1
नजिकच्या भातकुली (जैन) स्थित श्री आदिनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थान येथे रथयात्रा महोत्सव पार पडला. यावेळी श्री १००८ आदिनाथ भगवंतांचा जयकारा करण्यात आला. या जयकाऱ्याने अख्खे भातकुली शहर दूमदूमून गेले होते. मानस्तंभाचा विधिवत अभिषेक आणि पूजन करुन रथयात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला. रोहित हनुमंते, रुपेश नगरनाईक, सुशील गुलालकरी, मुकेश गुलालकरी, राज कहाते, गणेश मोरे यांनी या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. त्यानंतर मूलनायक श्री १००८ आदिनाथ भगवान स्वामींचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. अभिषेकापूर्वी उपस्थित सर्व भाविक भक्तांनी विधिवत पंचामृत अभिषेकाची बोली केली तसेच शेकडो भाविक भक्तांनी पुरुष व महिला यांच्या उपस्थितीत श्रीजींचा विधिवत पंचामृत अभिषेक केला. तसेच भजन मंडळीने विधिवत पूजन पाठ करून भजनांचा कार्यक्रम मंदिरात केला. अभिषेक पूजनानंतर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत मालेगावचे ॲड. धनंजय रोकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांद्वारे वासल्य भोज भंडारा झाला. याचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. याच दरम्यान श्री १००८ आदिनाथ भगवंतांची पूजा, अष्टक भातकुलीच्या जैन भजन मंडळीच्या सानिध्यात उत्साहाने पार पडली. रथइंद्र चे लाभार्थी भाविक भक्तांनी श्रीजींच्या प्रतिमेला विधीवत सुशोभित रथामध्ये विराजमान केले. या घडीला संस्थानचे अध्यक्ष सतीश संगई यांनी श्रीजी यांची आणि रथाची विधिवत पूजा केली. त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी रथावर श्रीजींची प्रतिमा विराजमान करून दोरीच्या सहाय्याने रथाला हातांनी ओढले आणि संपूर्ण भातकुली नगरीमध्ये रथ भक्तीगीत आणि नाचगाणे म्हणत फिरवला. कार्यक्रमाला संस्थानचे अध्यक्ष सतीश संगई यांच्यासह उपाध्यक्ष मनोहरराव डाखोरे, सचिव राजकुमार जैन, सहसचिव राजकुमार डोणगावकर तसेच वसंतराव बडनेरकर, कर्मचारी संतोष कहाते, दीपक भोंगाडे, पराग हनुमंते तसेच कांचनताई संगई, संज्योत संगई, दर्शना संगई, रुपेश नगरनाईक, यश कहाते, राज कहाते, माधुरी कहाते, मुकेश गुलालकरी, संदेश गुलालकरी तसेच अंजनगाव सुर्जी, अमरावती, बडनेरा, वर्धा, नांदगाव पेठ,नांदगाव खंडेश्वर आणि इतर ठिकाणचे भाविक भक्त उपस्थित होते. चौकट---- पंचामृत अभिषेक आणि महाआरती रथावर विराजित श्रीजींची प्रतिमा परत मंदिरात अभिषेकस्थानी विराजमान करण्यात आली आणि त्यानंतर संध्याकाळी पंचामृत अभिषेकासाठी भाविक भक्तांनी पंचामृत अभिषेकाची बोली घेतली. अभिषेकानंतर वात्सल्य भोज दानकर्ते रोकडे परिवार यांचे संस्थांनकडून स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभानंतर महाआरती करण्यात आली आणि पुन्हा विधिवत मुख्य वेदीवर प्रतिमा विराजमान करण्यात आली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)