300 दिव्यांग अन् वंचित घटकांतील मुलामुलींनी घेतला दांडियाचा आनंद:निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजन, सदस्यांनीही धरला ठेका

2 hours ago 1
सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. शहरातील विविध देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंडळांच्या वतीने विविध स्पर्धांसह रास गरब्याचे आयोजन केले आहे, परंतु या सर्व आनंदापासून वंचित घटकातील मुले-मुली दूरच आहेत. ही बाब लक्षात घेऊन शहरात वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांतील मुला-मुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दांडियाचे आयोजन केले होते. या मुला-मुलींनीही मनसोक्त दांडिया खेळण्याचा नुकताच आनंद घेतला. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दिव्यांग व वंचित घटकांतील मुलांसाठी रास दांडियाचे आयोजन केले होते. त्यात स्नेहालय, अनामप्रेम, सावली, बालघर या संस्थांमधील ३०० पेक्षा जास्त मुला-मुलींनी सहभाग घेतला. यावेळी या मुला-मुलींना दांडिया खेळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या मुलांसोबतच संस्थांच्या सर्वच सदस्यांनी दांडिया खेळण्याचा उत्स्फुर्त आनंद घेतला. प्रास्तविकात अतुल डागा म्हणाले, की निरंजन सेवाभावी संस्थेने नेहमीची सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. अशा संस्थांमधील मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा, त्यांचे शैक्षणिक पालकत्व, अशा उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. नवरात्रीत दांडियाचे लहानथोर सर्वांनाच आकर्षण असते. दिव्यांग व वंचित मुलांसाठी विशेष दांडियाचे आयोजन केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. आमच्यासाठी तो क्षण महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. दीपा चंदे, सपना आसावा, उद्योजक जितेंद्र बिहानी, संजय पुगालिया, गौतम मुनोत, मनिष सोमाणी, नीरज काबरा, धनेश कोठारी, अनुप खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपा शुक्रे यांनी, तर रविकांत काबरा यांनी आभार मानले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा दिव्यांग मुलांनी दांडिया खेळण्याचा घेतलेला आनंद आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमातून वंचित घटकांनाही समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम होत आहे. अशा मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन नकुल चंदे यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article