33 पैकी 30 बस निवडणुकीसाठी:मोर्शीत अवघ्या ३ बसवर वाहतूक, दोन दिवस प्रवाशांची अडचण
2 days ago
1
उद्या, बुधवार, २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी मोर्शी आगाराच्या ३३ पैकी ३० बसेसची बुकिंग करण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून अवघ्या ३ बसेस द्वारे प्रवाशांची वाहतूक करावी लागत आहे. बुधवारी विधानसभेचे मतदान होणार असून मतदानाच्या एक दिवस आधीच कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचतात. त्यामुळे या बसेस आज, मंगळवार, १९ तारखेलाच ताब्यात घेण्यात आल्या. मतदान झाल्यानंतर कर्मचारी रात्री परत आणले जातात. त्यामुळे आज-उद्या असे दोन दिवस एस.टी. निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहे. मोर्शी आगाराकडे एकूण ३३ बसेस असून त्यातील ३० बस निवडणूकीच्या कामासाठी बुक झाल्या आहे. या माध्यमातून एसटीला उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली असली तरी मोर्शी आगाराकडे दोन दिवस केवळ ३ बसेसवर आपला कारभार चालवावा लागत आहे. त्यातही १ बस आवश्यक सेवेसाठी आरक्षीत ठेवली असून अवघ्या दोन बसेसवर मोर्शी आगाराला आपला डोलारा सांभाळावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात येणाऱ्या प्रवाशांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. यादरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या बंद राहणार असल्याचे मोर्शी आगार विभागाकडून सांगण्यात आले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)