900 एकरचे मैदान, 500 क्विंटल बुंदी अन् महाप्रसाद:मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

2 hours ago 1
महाराष्ट्रात दसरा मेळाव्यांना विशेष स्थान आहे. शिवसेना ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा मेळावा मुंबईत होणार आहे. बीड येथील सावरगाव येथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मेळावा होणार आहे. मात्र यंदा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा देखील दसरा मेळावा होणार आहे. मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा शनिवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर होणार आहे. मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला बीड पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मराठा समाजाने या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांचा हा मेळावा नारायण गडावरील तब्बल 90 एकर जागेवर घेतला जाणार आहे. यासाठी सुमारे 200 एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिका असणार आहेत तसेच 10 वैद्यकीय कक्ष देखील असणार आहे. यात भर म्हणजे जवळपास 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद देखील वाटण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांच्या मेळाव्यानंतर महाप्रसाद असल्याने पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवातीला परवानगी मिळत नव्हती. मात्र अखेर पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी दिली आहे. परवानगी जरी दिली असली तरी पोलिसांनी काही अटी देखील घातल्या आहेत. मेळाव्यात प्रक्षोभक भाषण तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आराक्षण मिळण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडथळा आणत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी ज्या मागण्या केल्या आहेत त्या अद्याप सरकारकडून पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे मनोज जरांगे पुढची भूमिका काय घेणार याकडे मराठा समाजाचे लक्ष असणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article