Agartala -LTT Express: Breaking News: आगरतळा-लोकमान्य टर्मिनस एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले…

2 hours ago 1

दिबालाँग (Agartala -LTT Express) : आसाममधील दिबालाँग स्टेशनवर आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनसचे 8 डबे रुळावरून घसरले. मात्र, या (Agartala -LTT Express) अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, कोणतीही मोठी दुर्घटना किंवा दुखापत झालेली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

8 coaches of Agartala-Lokmanya Tilak Express derails successful Assam

Read @ANI Story | https://t.co/kD72eltdz3#Derailment #Train #AgartalaLokmanyaTilak pic.twitter.com/eMFJ20CAlH

— ANI Digital (@ani_digital) October 17, 2024

माहितीनुसार, आज सकाळी आगरतळाहून निघालेली 2520 आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनस (Agartala -LTT Express) एक्स्प्रेस लुमडिंग विभागांतर्गत डिब्लाँग स्टेशनवर लुमडिंग-बदरपूर हिल विभागात रुळावरून घसरली. ट्रेनचे पॉवर कार आणि इंजिनसह 8 डबे रुळावरून घसरले. ईशान्य फ्रंटियर रेल्वे सीपीआरओने सांगितले की, कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. बचाव आणि पुनर्संचयित कार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लुमडिंग येथून अपघात निवारण ट्रेन आणि अपघात निवारण वैद्यकीय गाडी घटनास्थळी रवाना झाली आहे.

लुमडिंग-बदरपूर सिंगल लाईन सेक्शनवरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. लुमडिंगमधील हेल्पलाइन क्रमांक 03674 263120, 03674 263126 आहेत. त्याचवेळी, या अपघातावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, “12520 आगरतळा-एलटीटी एक्स्प्रेसचे (Agartala -LTT Express) 8 डबे लुमडिंगजवळील डिब्लॉन्ग स्टेशनवर आज 15:55 वाजता रुळावरून घसरले. यात कोणताही मोठा अपघात किंवा दुखापत झालेली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप-सुरक्षित आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article