अकोल्यात पुतण्याचा काकाला धक्का; महायुतीचे लहामटेंनी गड राखला, तर अमित भांगरे पराभूत Pudhari
Published on
:
24 Nov 2024, 9:02 am
Updated on
:
24 Nov 2024, 9:02 am
Political News: विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ५ हजार ५५६ मते घेत शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा दारूण पराभावकरत विजय मिळविला आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघात दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे, शरद चंद्र पवार गटाचे अमित भांगरे अपक्ष उमेदवार वैभव पिचड उबाठाचे बंडखोर उमेदवार मधुकर तळपाडे, अपक्ष मारुती मेंगाळ यांनी निवडणूक लढवली, अकोले विधानसभा मतदारसंघात १ लाख ९२ हजार ५१६ मतदार झाले. तर २ हजार ९३५ पोस्टल मतदान झाले.
असे एकुण १ लाख ९५ हजार ४९१ मतदान झाले होते. तर शनिवारी सकाळी अकोले तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात होऊन पहिल्या फेरीत शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांना ४४७२ मते तर अजित दादा पवार गटाचे आ.डॉ. किरण लहामटे यांना १७९७ मते मिळाल्याने २७७५ मताने आ.डॉ. लहामटे हे पिछाडीवर पडत भांगरे यांनी आघाडी घेताना दिसून आले आहेत.तसेच उमेदवार अमित भांगरे यांना आ.डॉ. लहामटे पेक्षा अधिक मिळालेलं १ हजार १७८ मतदानाची बरोबरीचं आव्हान आ.डॉ. किरण लहामटे यांनी सहाव्या फेरीनंतर बाराव्या फेरीच्या दरम्यान बरोबरी गाठत शेवटच्या २२ व्या फेरी अखेर अमित भांगरे ६८४०२ मते,आ. डॉ. किरण लहामटे ७३९५८ मते, वैभव पिचड ३२२८६ मते मिळाली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ५ हजार ५५६ मते घेत शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा दारूण पराभाव करत विजय मिळवत दुसऱ्यादां अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे झाले आहेत.परंतु निवडणुकीत २२व्या फेरीच्या मोजणी नंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांनी व्ही व्ही पॅड मतमोजणीची नव्याने मागणी केली.
त्यामुळे निवडणूक अधिकारी अनुप सिंग यादव यांनी मतदान केंद्राची पुन्हा मतमोजणी घेऊन आमदार डॉ. किरण लहामटे यांना ७३९५८ मते मिळाल्याचे जाहीर करत विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तर अकोले विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेचे कामकाज निवडणूक अधिकारी अनुप सिंग यादव आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी कामकाज पाहिले. तसेच पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी चोख बंदोबस्त बजविला.