Jharkhand CM | झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाPudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 11:59 am
Updated on
:
24 Nov 2024, 11:59 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आज (दि.२४) राज्यपालांकडे सुपूर्द केला. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला 34 जागांवर मोठे यश मिळेल आहे. विधानसभा निवडणुकीतील बहुमतानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडमध्ये नवीन सरकार स्थापनेचा दावा देखील केला आहे.
#WATCH | Ranchi: Jharkhand CM and JMM executive president Hemant Soren says, "On 28 November the oath ceremony of the new government will take place..."
He adds, "Today we have started the procedure to form the (INDIA) alliance government and in that series, we have staked a… pic.twitter.com/fwYXm8sUUu
— ANI (@ANI) November 24, 2024झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आहे. झारखंडच्या एकूण ८१ जागांमध्ये इंडिया आघाडीला ५६ जागा मिळाल्या आहेत. तर एकट्या भाजपला केवळ २१ तर त्यांच्या मित्र पक्षांनी ३ जागांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा ४१ आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी हेमंत सोरेन यांनी एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. या सरकारचा शपथविधी गुरूवार २८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सोरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
झारखंडमधील गंगावर येथे झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सोरेन म्हणाले, "मी सरकार स्थापनेचा दावा केला आहे, आणि आघाडीतील भागीदारांचे समर्थन पत्र राज्यपालांना सुपूर्द केले आहे. त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. गुरूवार २८ नोव्हेंबर रोजी हा शपथविधी होणार आहे".