उपर्या पालकमंत्र्याला परभणीकर कंटाळले आहेत
परभणी (Parbhani Mahayuti MLA) : राज्यात महायुतीची सरकार आली असून त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील तीन आमदार सोबत आहेत. जिल्ह्याला मागिल कित्येक वर्षापासून मंत्रीपद मिळालेले नसल्याने जनतेतून मंत्रीपद देण्याची मागणी होत आहे. दोन वेळा विजयी झालेल्यापैकी आ. मेघना बोर्डीकर साकोरे व आ. डॉ. रत्नाकर गुट्टे हे असून राष्ट्रवादी कडून तरुन अभ्यासू चेहरा आ. राजेश विटेकर असे तीन आमदार मंत्रीपदाच्या कुवतीचे आहेत. यापैकी कोणाची वर्णी या (Mahayuti MLA) सरकारमध्ये लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जिल्ह्यात विकासाचा बॅकलॉक मोठा
परभणी जिल्ह्याने यावेळी (Parbhani Mahayuti MLA) महायुतीच्या बाजूने मोठा कल दिला आहे. त्यामुळे यावेळी तीन आमदार महायुतीच्या घटक पक्षाचे आले आहेत. राज्यातही आज महायुतीचे सरकार आलेले आहे. जिंतूर विधानसभेत दुसर्यांदा आ. मेघना बोर्डीकर साकोरे, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दुसर्यांदा महायुती घटक पक्ष रासपचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे तर पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश विटेकर हे विजयी झाले आहेत. तीनही आमदार आज महायुतीमधील असून अभ्यासू आहेत. आज जिल्ह्यातील जनतेला जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार अशी अपेक्षा लागली आहे.
कारण आजपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री हा दुसर्या जिल्ह्याचा देण्यात आला. त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांची जान नसल्याने त्यांनी गांभीर्याने कधीच काम केले नाही. जिल्हा नियोजनाचा निधी वाटप करताना टक्केवारी जमा करुन घेवून जाण्याच एकमेव काम केले आहे. या प्रकारामुळे आज जिल्ह्यातील विकासाचा बॅकलॉक मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. पहिल्यांदाच राज्यात महायुतीचे सरकार येत असताना जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना विजयी करुन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याला (Mahayuti MLA) एक मंत्रीपद महायुती सरकारमध्ये मिळणे अपेक्षित आहे. जनतेने देखील महायुतीच्या उमेदवारांना चांगल्या मतांनी विजयी केल्यामुळे त्यांच्या मतदारांच्या मागणीकडे महायुती मधील वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष देणे गरजेचे आहे. या तीन आमदारांपैकी एकाला तरी मंत्रीपद मिळेल अशी आशा जनतेला लागलेली आहे.