शहरातील पाच जणांवर गुन्हा दाखल
परभणी/गंगाखेड (Gangakhed Elections Results) : विधानसभा निवडणुकीत आ. डॉ. रत्नाकर गुट्टे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विना परवाना विजयी रॅली काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिराने (Gangakhed Elections Results) गंगाखेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९७ गंगाखेड विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरातील संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, पोलीस उपनिरीक्षक असद शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, गोपनीय शाखेचे जमादार गणेश चनखोरे, पोलीस शिपाई परसराम परचेवाड, अनंत डोंगरे आदी मतमोजणी बंदोबस्तासाठी तैनात असतांना विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे समर्थक कार्यकर्ते हनुमंत लटपटे रा. कोद्री, सुमित कामत, अँड. कलीम, सत्यपाल साळवे, अहमद खान पठाण सर्व रा. गंगाखेड आदींनी आ. डॉ. गुट्टे यांच्या कार्यालयासमोर जमा होऊन कलम १६८ बी.एन.एस. प्रमाणे नोटीस बजावलेली.
दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयापासून रत्नाकर गुट्टे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. गुट्टे साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत (Gangakhed Elections Results) शहरातील मुख्य मार्गावर विनापरवाना विजयी मिरवणूक काढत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची फिर्याद जमादार गणेश उत्तमराव चनखोरे यांनी दिल्यावरून शनिवार रोजी रात्री उशिराने पाच जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण हे करीत आहेत.