Published on
:
24 Nov 2024, 5:42 pm
Updated on
:
24 Nov 2024, 5:42 pm
यवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूका पार पडून काल २३ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतमोजणी पार पडली. या निवडणूकीत निवडून येणाऱ्या प्रथम दोन उमेदवारांचा अंदाज आल्यानंतरही बहुसंख्य मतदार अपक्ष व इतर पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतात. याशिवाय मागिल काही वर्षापासून उमेदवारांच्या नावानंतर एक नोटा (यापैकी कोणीही नाही) नावाचा पर्यायही मतदारांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
रिंगणात असलेला एकही उमेदवार पसंतीस उतरला नाही नसल्यास किंवा एकाही उमेदवाराला मतदान करण्याची मानसिकता नसल्यास त्या मतदाराला ‘नोटा’ हा मतदान करण्याचा शेवटचा पर्याय आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात मतदारसंघातून एकूण ८ हजार ५७५ मतदारांनी नोटाला मतदान केले असून त्याची टक्केवारी ०.३९ टक्के एवढी आहे.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नोटाला ८३८ मते पडली आहे. या ८३८ मतदारांच्या येथून रिंगणात असलेल्या २२ पैकी एकही उमेदवार पसंतीस उतरला नाही असा त्याचा अर्थ काढायला हरकत नाही. राळेगाव विधानसभा मतदारसंघात नोटाला १३१७ मते मिळाली. वणी मतदारसंघात नोटाला १३३५ मते मिळाली. आर्णी मतदारसंघात नोटाला १५६९ मते मिळाली. दिग्रस मतदारसंघात नोटाला १५४० मते मिळाली आहे. पुसद मतदारसंघात नोटाला १३४८ मते मिळाली आहे.
उमरखेड मतदारसंघात ६५४ मते मिळाली आहे. आर्णी मतदारसंघात नोटाला सर्वाधिक तर उमरखेड मतदारसंघात नोटाला सर्वात कमी मते मिळाली आहे. नोटाला मिळालेल्या मतदानाचा रिंगणातील कोण्या उमेदवारावर काय परिणाम झाला. याचा अंदाज लावता येणार नाही, मात्र या मतदारांना रिंगणात असलेला उमेदवार पसंत पडला नाही, एवढे मात्र नक्की.