एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड:बैठकीत चार ठराव मांडले, PM मोदी, अमित शहांचेही केले अभिनंदन

2 hours ago 1
एकनाथ शिंदे यांनी ताजलँड हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांनी एकमताने ठराव पास करून एकनाथ शिंदे यांनी गटनेतेपदी निवड केली आहे. तसेच, या बैठकीमध्ये चार ठराव मांडण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही अभिनंदन करण्यात आले. सोबतच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवडही करण्यात आली. लाडक्या बहिणींनी सावत्र भावाचा कार्यक्रम केला - एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे म्हणाले - लाडक्या बहिणींना आपण कायम सावत्र, कपटी आणि दुष्ट भाऊ कोण हे सांगत राहिलो. त्यामुळे त्यांनी त्यांचा कार्यक्रम करून टाकला. हा फार मोठा विजय आहे. विरोधकच शिल्लक ठेवले नाहीत. एवढा मोठा विजय हा केवळ लाडक्या बहिणींमुळे मिळाला. तसेच, काही सहकारी हेदेखील हजार ते बाराशे मतांनीच पडलेले आहेत. जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला असून आपल्याला त्याच उत्साहाने काम करायचे आहे. निवडून आलेल्या सर्व आमदारांचे स्वागतही एकनाथ शिंदे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आता आपण दिवसेंदिवस असेच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवत जाणार आहोत. मी माझ्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळणार असून लवकरच त्यांच्या खात्यात एकवीसशे रुपये पडणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलतांना दिले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व आमदारांचे स्वागत केले. आणि त्यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी जोमाने कामाला लागायचे असल्याचेही सांगितले. ही बातमी पण वाचा... अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड:सत्तास्थापनेच्या हालचालींना मुंबईत वेग, शिवसेनेचीही आज बैठक अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमुखाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत अजून अशी काही चर्चा झाली नाही. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही अपेक्षा आहे, पण भाजपचे नेते ठरवतील ते मान्य असेल. काल विजयाचा आनंद आम्ही सगळ्यांनी साजरा केला. सत्ता स्थापनेच्या घडामोडी 48 तासात पूर्ण होईल, अभूतपूर्व यश राष्ट्रवादी पक्षाला मिळाले. राज्यात नवीन पर्व उदयास आला आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सविस्तर बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article