शाहरुख खानला 'कोलकत्ता' नाही तर 'ही' टीम घ्यायची होती विकत

1 hour ago 1

बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरूख खान आपल्या 'कोलकाता नाइट राइडर्स' या संघामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. File Photo

Published on

24 Nov 2024, 5:32 pm

Updated on

24 Nov 2024, 5:32 pm

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरूख खान आपल्या 'कोलकाता नाइट राइडर्स' या संघामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आयपीएलच्या काही निवडक लोकप्रिय संघांपैकी 'कोलकत्ता नाईट राइडर्स' हाही एक संघ क्रिकेटप्रेमींचा आवडता संघ बनला आहे. लवकरच 'आयपीएल 2025' चा सीझन सुरू होत असून यादरम्यान आयपीएलचे प्रवर्तक ललित मोदी यांनी शाहरूख खानच्या आयपीएल टीमबाबत एक मोठा खुलासा केला आहे. (IPL AUCTION 2025)

२००८ मध्ये शाहरूख खानने आपली जवळची मैत्रीण अभिनेत्री जुही चावला यांच्यासोबत भागीदारी करत कोलकत्ता (केकेआर) हा संघ ५७० कोटी रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर २०१२, २०१४ व २०२४ अशी तीन वेळा इंडियन प्रिमिअर लीग जिंकत कोलकता टीमने क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केले आहे. (IPL AUCTION 2025)

'मुंबई इंडियन्स' होती शाहरूखची पहिली पसंत

ललित मोदी यांनी त्याच्या संघाबाबत पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, तीन वेळा आयपीएल जिंकत आज केकेआर हा संघ लोकप्रिय झाला असला तरी शाहरूख खानची पहिली पसंत कोलकत्ता (केकेआर) नव्हे तर मुंबई इंडियन्स हा संघ होता. मात्र मुकेश अंबानी यांनी त्या संघाची निवड केली. त्यानंतर त्याने बंगळुरू विकत घेण्याचा विचार केला, मात्र तोही संघ विजय मल्ल्याने विकत घेतला. त्यानंतर त्याने केकेआर हा संघ विकत घेतला. (IPL AUCTION 2025)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article