Published on
:
24 Nov 2024, 4:52 pm
Updated on
:
24 Nov 2024, 4:52 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क :
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. ट्रम्प यांच्या विजयात जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांचाही हातभार होता. त्यांनी ट्रम्प यांचा जोरात प्रचार केला. आता विशेष बाब म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणूकीनंतर मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.
बुल्मबर्गच्या नव्या अहवालानुसार आता मस्क यांची संपत्ती ३४७.८ बिलीयन डॉलर्स इतकी झाली आहे. विशेष जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत असलेले ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस यांच्यापेक्षा मस्क यांची संपत्ती १०० बिलीयन डॉलर्सने जास्त आहे. बेजोस यांची संपत्ती २१९ बिलीयन डॉलर्स आहे. टेस्ला ही इलेक्ट्रिक कार कंपनी, स्पेस एक्स ही अंतराळ संशोधन संस्था , सोशल मिडीया कंपनी एक्स, इंटरनेट कंपनी स्टारलिंक, तसेच न्यरालिंक, आर्टिफिशिएल इंटेलिजन्समध्ये काम करणारी एआय एक्स या कपंन्या एलॉन मस्क यांच्या मालकीच्या आहेत.
मस्क यांनी त्यांच्याच संपत्तीचा रेकॉर्ड मोडला आहे. २०२१ मध्ये मस्क यांची सपंत्ती ३४० बिलीयन डॉलर्स झाली होती. आता त्यांच्या सपत्तीत झालेल्या वाढीचे कारण टेस्ला या त्यांचा कार कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ. शुक्रवारी टेस्लाच्या शेअर्सच्या रक्कमेमध्ये ३.८ टक्के इतकी वाढ झाली आहे. या कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची संख्या ४० टक्के वाढली आहे. त्याचबरोबर एआय एक्स या कंपनीचे मुल्यही गेल्या काही महिन्यात दुप्पट झाले असून ते आता ५० बिलीयन डॉलर्सवर गेले आहे. या सर्वामुळे मस्क यांच्या सर्वच कंपन्याच्या व्हॅल्यूएशनमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Elon Musk’s net worth hit an all-time high of $347.8 billion, driven by Tesla’s ongoing stock rally and a new funding round valuing his artificial intelligence startup xAI at $50 billion https://t.co/JdjV9jFfxp
— Bloomberg Wealth (@wealth) November 22, 2024