मुंबईत सुलभाताई खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सत्कार:राकाँतर्फे विजयी झालेल्या विदर्भातील एकमेव महिला आमदार

2 hours ago 1
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावतीतून विजयी झालेल्या आमदार सुलभाताई खोडके यांचे मुंबईत पोहोचल्यानंतर राष्ट्रवादी भवनात जोरदार स्वागत करण्यात आले. राकाँतर्फे विजयी झालेल्या त्या विदर्भातील एकमेव महिला आमदार आहेत. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विजयी झालेल्या ४१ आमदारांची बैठक आज, रविवार, २४ नोव्हेंबर रोजी मुंबई स्थित पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मावळते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विधीमंडळ गटनेतापदी एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला इतर आमदारांसमवेत सुलभाताई खोडकेदेखील उपस्थित होत्या. त्यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, जेष्ठ नेते छगनराव भुजबळ, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मावळते कृषी मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, संजय खोडके आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वरिष्ठठ नेते मंडळी व महाराष्ट्रातून विजयी झालेले सर्व आमदार उपस्थित होते. महायुतीसोबत निवडणूक लढविताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला ५५ जागा आल्या होत्या. त्यापैकी पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आहे. अमरावती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुलभाताई खोडके यांना ६०,०८७ मते मिळाली. या विजयासह त्या तिसऱ्यांदाा विधानसभेत पोहोचल्या आहेत. विदर्भात राकॉतर्फे विजयी झालेल्या त्या एकमेव महिला आमदार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article