बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा आशीर्वाद होता, जिंकणार हे माहीत होतं, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत म्हणाले आहेत. शनिवारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ज्यात माहीम विधानसभा मतदारसंघातून महेश सावंत विजयी झाले आहेत. यातच आज माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
महेश सावंत म्हणाले आहेत की, “आपल्याला जिंकायचं आहे या पद्धतीने ही लढत बघितली होती. त्या उद्देशाने मी या आखाड्यात उतरलो होतो. बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा आशीर्वाद होता. जिंकणार हे माहीत होतं. अमित ठाकरे नवखे होते. राजकारणाची एवढी त्यांना माहिती नव्हती. थोडी धाकधूक होती. शिवाजी पार्कचा पट्टा मनसेला मिळेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही.”
ते म्हणाले की, ”सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. पुढचे पाच वर्षे मी एवढं काम करणार आहे की, आमदार कसा असावा हे संपूर्ण जनतेला समजेल. खूप टफ झाली पण मी विजयी झालो.” दरम्यान, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महेश सावंत हे सर्वात आधी शिवसैनिकांचे स्फुर्तीस्थान, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक झाले.