मविआ नेत्यांना अहंकार आला होता,असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला दिला.filephoto
Published on
:
24 Nov 2024, 2:29 pm
Updated on
:
24 Nov 2024, 2:29 pm
नागपूर : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाने अहंकार आला होता. सरकार दूर दूर पर्यंत येण्याची चिन्ह नसताना मी भावी गृहमंत्री, मी भावी महसूल मंत्री अशा पद्धतीची भाषा होती. विजय नम्रतेने स्वीकारला नाही तर हा विजय पराभवाच्या मार्गाने पुढे जातो. असा टोला भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
नाना पटोले यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या गोष्टी सुरू होत्या. आता ते काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेही बनू शकत नाहीत. त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. काँग्रेसने ३० हजार देतो म्हटलं असतं तरी त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. या अगोदर त्याच पद्धतीने कर्नाटकमध्ये धोका केला. हिमाचलमध्ये धोका केला त्यांची नीती साफ नाही हे जनतेला ठाऊक आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधानाचा सन्मान करावा लागतो. दहा टक्के पेक्षा कमी जागा निवडून आल्याने ते विरोध करू शकत नाही. संविधानाचा सन्मान करावा लागेल.
काँग्रेसचे निवडून आलेले आमदार बेचैन असणार आहेत. आमचा विजय आम्ही नम्रतेने स्वीकारतो. महायुतीवर जनतेने विश्वास व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पनेवर पुढे जाण्यासाठी हा मतरुपी आशीर्वाद दिला आहे. लाडक्या बहिणीने मतरुपी आशीर्वाद दिला. प्रेम व्यक्त केले. मोठा विजय महायुतीला मिळाला. असे ते म्हणाले.
धूल थी चेहरे पे आयना साफ करते रहे... आपण जे पेरतो आहे, आपल्याच नशिबात आपल्याच वाटेला येईल असं कधी विरोधकांना वाटलं नाही. ज्या पद्धतीने बेइमानी पेरली जनतेने तेच व्याजासकट पराभव स्वरूपात परत केले.शेवटी उद्धव ठाकरे यांनी औट घटकेचे राज्य करून काय मिळवले. काय फायदा झाला. त्यांच्या नावावर मुख्यमंत्री कसा वागू नये एवढेच उदाहरण आज जमा आहे.