हा विजय म्हणजे क्षेत्रातील जनतेचा व कार्यकर्त्यांचा विजय
नागपूर (MLA Dr. Ashish Deshmukh) : “माझ्या सावनेर-कळमेश्वर मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून निवडून येणार,याची खात्री होती. माझा विश्वास हा येथील जनतेवर असून त्यांना सुद्धा परिवर्तन हवे होते. मी या क्षेत्रातील जनतेला वचन देऊ इच्छितो की, (MLA Dr. Ashish Deshmukh) आमदार म्हणून माझी कामगिरी दमदार राहील. शेतकरी, शेतमजूर, दीन, दलित, आदिवासी, शोषित, पीडित, महिला आणि विशेष करून आमच्या तरुण युवक-युवतींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी अतिशय चांगली कामगिरी करेन. आणि त्या माध्यमातून आपल्या सावनेर-कळमेश्वर क्षेत्रातील जनतेला न्याय देण्याचे काम करेन.
सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे आभार
मागच्या तीस वर्षांमध्ये सावनेर-कळमेश्वर क्षेत्राला भकास व विनाशाकडे नेण्याचं काम सुनील केदार यांनी केले आहे. म्हणूनच येथील जनतेने परिवर्तनच नव्हे, तर जबरदस्त परिवर्तन करून विकासाला नवी दिशा दिली आहे. या ठिकाणी परिवर्तनाची लाट सर्वत्र बघायला मिळाली. मी (MLA Dr. Ashish Deshmukh) या निवडणुकीत माझे व्हिजन, माझा अजेंडा आणि दूरदृष्टी घेऊन जनतेसमोर गेलो. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून या क्षेत्रात कायापालट करण्यासाठी मला मतदान केले आहे. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मला खात्री आहे की, हे जे परिवर्तन झालेले आहे, ते जनतेच्या भल्यासाठी झालेले आहे आणि त्यांचे पाठबळ मला सतत मिळत राहील.
संपूर्ण सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राला फक्त विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने पहिल्या नंबरचं क्षेत्र बनवण्याचं काम मी नक्कीच करेन. नवे उद्योगधंदे व त्यातून मोठी रोजगार निर्मिती, क्षेत्रातील गुंडगिरीचा नायनाट यावर माझा भर राहणार आहे. शासकीय योजनांचा फायदा मी मोठ्या प्रमाणात क्षेत्रातील जनतेला करून देणार आहे. माझी कामगिरी दमदार राहील.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), भाजपा व महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. हा विजय माझ्या क्षेत्रातील जनतेचा व कार्यकर्त्यांचा विजय आहे”, अशी विजयी प्रतिक्रिया सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे भाजपा / महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. आशिषराव देशमुख (MLA Dr. Ashish Deshmukh) यांनी व्यक्त केली.
23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यांनी काँग्रेसच्या अनुजा सुनील केदार यांचा दारुण पराभव केला. संपूर्ण विधानसभा क्षेत्रात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मिठाई, आतिषबाजी, डिजे, ढोल-ताशारेच्या निनादात डॉ. आशिषराव देशमुख (MLA Dr. Ashish Deshmukh) यांची हजारोंच्या सहभागाची भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. आयुश्री आशिषराव देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, अशोक धोटे, किशोर चौधरी, हृदय देशमुख, जिगर देशमुख तसेच अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येत सहभागी झाले होते. दरम्यान, डॉ. आशिषराव देशमुख यांचे त्यांच्या दमदार विजयाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.