Nitin Gadkari: महायुतीचे अभूतपूर्व यश कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित

2 hours ago 1

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : ‘लाडकी बहीण’सह राज्य आणि केंद्राच्या योजनांचेही श्रेय

नागपूर (Nitin Gadkari) : भाजपसह महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Elections Results) मिळालेले अभूतपूर्व यश हे राज्याच्या व केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवारी) व्यक्त केली. महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे आणि भाजप नेते संजय भेंडे यांची उपस्थिती होती.

📍नागपूर

शुभं भवतु ।।

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या भव्य आणि ऐतिहासिक विजयानंतर उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री @cbawankule जी यांनी आज नागपूरमध्ये निवासस्थानी भेट घेतली. भाजप-महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि… pic.twitter.com/vZLBf4uH4Z

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 23, 2024

ना.  गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, ‘भाजप-महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आजपर्यंतच्या इतिहासात भाजपला मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यासह विदर्भात देखील महायुतीच्या उमेदवारांनी दमदार यश मिळवले. त्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांचे आणि विजयी आमदारांचे अभिनंदन.’

🕗 7.50pm | 23-11-2024📍Nagpur | संध्या. ७.५० वा. | २३-११-२०२४📍नागपूर.

🪷A Moment of Blessings and Guidance…!🙏✌️
After the historical triumph of BJP-MahaYuti, visited and took blessings of our leader, Hon Union Minister Nitin ji Gadkari, astatine his residence successful Nagpur. Kanchan… pic.twitter.com/31pPoABJWu

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024

लोकसभा निवडणुकीत भाजपवर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. या सर्व आरोपांना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जातीपातीच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून मतदान केले. एवढेच नव्हे तर विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. केंद्र सरकारची आयुष्मान योजना, उज्ज्वला योजना तसेच महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे मोठे यश आहे,’ असेही ना. गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article