Published on
:
21 Jan 2025, 3:58 am
Updated on
:
21 Jan 2025, 3:58 am
नाशिक : गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह हे शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्हा दौर्यावर येत असून, दुपारी साडेबाराला ते त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या दौर्याचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
शुक्रवारी सकाळी 11.55 वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार असून, बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते त्र्यंबककडे प्रस्थान करतील. 12.20 ला त्र्यंबक येथील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरेल. तेथून ते मोटारीने त्र्यंबकेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतील. १२.३०ला त्र्यंबकेश्वर मंदिरात आगमन होणार असून, त्याठिकाणी ते त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजन करणार आहेत. मंदिरातील पूजेसाठी वीस मिनिटांचा कालावधी आरक्षित असणार आहे. त्यानंतर दुपारी एकला ते हॅलिकॉप्टरने मालेगावकडे रवाना होतील. दुपारी दोनला गृहमंत्री शाह हे मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह फर्मला भेट देणार आहेत. याठिकाणी सहकार परिषद आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीनला बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते ओझर विमानतळावरून बीएसएफच्या विमानाने मुंबईकडे परततील.