केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. (संग्रहित छायाचित्र)
Published on
:
23 Sep 2024, 7:06 am
Updated on
:
23 Sep 2024, 7:06 am
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी (दि.२५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस सतर्क झाले असून बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
गणेशोत्सव व ईद- ए- मिलादच्या बंदोबस्तानंतर शहरात केंद्रीय मंत्री शहा यांचा दौरा आयोजित केला आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा सातपूर परिसरात होणार आहे. या मेळाव्याला गृहमंत्री शहा मार्गदर्शन करणार आहे. सातपूर परिसरातील हॉटेल तसेच, मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांच्या संख्येची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.