Jasprit Bumrah property league aus vs ind 1st testImage Credit source: Icc X account
साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे बॉर्डर गावसकर ट्रॉफीकडे साऱ्यांच लक्ष लागून आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया सलामीच्या सामन्यात रोहित शर्मा याच्याशिवाय मैदानात उतरणार आहे. अशात जसप्रीत बुमराह याच्याकडे नेतृत्व देण्यात आलं आहे. शुबमन गिल दुखापतीमुळे खेळणार नसल्याने आता प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार आणि कोण नसणार? अशी चर्चा रगंली होती. मात्र बुमराहने प्लेइंग ईलेव्हनचं चित्र स्पष्ट केलं आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहने प्लेइंग ईलेव्हनबाबत स्पष्ट केलं आहे.
सलामीच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन फिक्स अर्थात निश्चित झाल्याचं कर्णधार जसप्रीत बुमराह याने स्पष्ट केलंय. मात्र प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण आहेत? हे तुम्हाला शुक्रवारी सकाळी टॉसवेळेसच समजेल, असं बुमराहने सांगितलं. “आम्ही प्लेइंग ईलेव्हन निश्चित केली आहे. आता तुम्हाला शुक्रवारी सकाळी समजेल”, असं बुमराहने म्हटलं.
बुमराहची प्लेइंग ईलेव्हनबाबत प्रतिक्रिया
Stand-in skipper Jasprit Bumrah has discussed India’s playing XI and filling successful for Rohit Sharma up of the commencement of the important Test bid against Australia connected Friday 👀#AUSvIND | #WTC25https://t.co/Ty5SxlbMU7
— ICC (@ICC) November 21, 2024
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नीतीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड.