विधानसभा संपताच भाजपचं नवीन अभियान file photo
Published on
:
24 Nov 2024, 8:56 am
Updated on
:
24 Nov 2024, 8:56 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच भाजपने 'सदस्यता अभियान'ला सुरूवात केली आहे. या अभियानासंदर्भात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या अभियानांतर्गत भाजपचे १ कोटी ५१ लाख नवीन सदस्य नोंदणीच लक्ष असून आजपासून नोंदणीला सुरूवात झाली आहे. भाजपला मतदान दिलेल्या सर्व जनतेने सदस्यता अभियानाच्या माध्यमातून भाजपसोबत जोडावे आणि पक्षाला मजबूत करावे, असे आवाहन बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.