BJP शिंदेंना एकेका जागेसाठी रडवणार:आता खेळ सुरू झाला, प्रथम तत्व सांगून छाटणी, नंतर सर्व्हे दाखवून उमेदवार बदला म्हणणार - दानवे

2 days ago 2
राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे गटाला एकेका जागेसाठी रडवेल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा फड रंगणार असून, त्यानंतर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा रंगात आली आहे. त्यातच विधानपरिषदेतील जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. ..मग सर्व्हे अन् शेवटी उमेदवार बदलायच्या अटी अंबादास दानवे यांनी महायुतीमधील जागावाटपाच्या संघर्षाकडे अंगुलिनिर्देश करून भाजप एकेका जागेसाठी शिंदे गटाला रडवणार असल्याचा दावा केला आहे. आताच दिल्लीच्या वजीराने मिंधे आणि त्यांच्या गटाला 'त्याग' शब्दाचे महत्व सांगितले म्हणे! खेळ सुरू झाला आहे. आता तत्व वगैरे सांगून शिंदे गटाच्या जागांची प्राथमिक छाटणी होईल. मग येतील सर्व्हे, मग येतील उमेदवार बदलायच्या अटी. लक्षात ठेवा, शिंदे गटाला भाजप एक-एक जागेसाठी रडवणार, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी महायुतीतील जागा वाटप आणि त्यात शिंदेंच्या शिवसेनेची काय अवस्था असेल? यावर भाष्य केले आहे. महाराष्ट्राची जनता यांचा निकाल लावेल उल्लेखनीय बाब म्हणजे अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीवरून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावरूनही बरीच चर्चा रंगली होती. ते म्हणाले होते, हा फोटो आठवतोय ना? या पहाटेच्या शपथविधीची तारीख होती 23 नोव्हेंबर 2019. आता 23 नोव्हेंबर 2024 रोजीच महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडी यांचा निकाल लावणार आहे! काळे जॅकेट आणि पांढरा शर्ट घातलेले या फोटोतील नेते आता गेले दोन वर्षांतील घटनाबाह्य सरकारच्या काळातील जंत्री आपल्यापुढे वाचतील. मात्र यांनी पाच वर्षांपूर्वी केलेला हा पहाटेचा शपथविधी फक्त लक्षात ठेवावा.. बाकी विजय आपलाच आहे, असे दानवे म्हणाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article