लॉरेन्स बिश्नोईची धमकी सलमानला रोखू शकली नाही, 3 तास उशिरा का होईना, पण चित्रिकरणाला सुरुवात, सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त

2 hours ago 1

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगकडून वारंवार धमकी दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याला धमकी दिली जात आहे. विशेष म्हणजे बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी देण्याची पहिली वेळ नाही. बिश्नोई टोळीकडून याआधीदेखील अनेकदा सलमानला धमकी देण्यात आली आहे. तसेच बिश्नोई गँगच्या तरुणांनी सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसचीदेखील रेकी केली आहे. तसेच त्यांनी सलमानच्या मुंबईतील राहत्या घरावरही गोळीबार केला आहे. त्यामुळे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात आहे. जवळपास 100 पोलीस सलमानच्या गॅलक्सी घराबाहेर तैनात आहेत.

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सलमान खान बिग बॉस सीझन 18 चं चित्रिकरण अर्धवट सोडून लीलावती हॉस्पिटलच्या दिशेला रवाना झाला होता. त्याने सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली होती. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यविधीच्या वेळी देखील आपला जीव धोक्यात असताना सुद्धा सलमान खान बडा कब्रस्तान येथे गेला होता. या सर्व घटनांनंतर सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली. पण सलमान खान बिथरला नाही. अखेर सलमानने या घटनांनंतर पुन्हा एकदा चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. सलमान खान बिग बॉस हिंदीच्या विकेंडचा वार या एपिसोडच्या चित्रिकरणासाठी आज मुंबईतील फिल्मसिटीत पोहोचला. या चित्रिकरणासाठी तीन तास उशिर झाला. पण लॉरेन्स बिश्नोईची धमकी सलमानला चित्रिकरण करण्यापासून रोखू शकली नाही. सलमानने डंके की चोट पर न घाबरता पुन्हा एकदा चित्रिकरणाला सुरुवात केली आहे.

चित्रिकरणाच्या ठिकाणी काय-काय व्यवस्था?

सलमान खान दुपारचं जेवण केल्यानंतर 4 वाजेपासून चित्रिकरणाला सुरुवात करतो. पण यावेळी चित्रिकरणाला सुरुवात होण्यास तीन तास उशिर झाला. त्यामागे देखील कारण आहे. यावेळच्या विकेंडच्या वारमध्ये कोणतेही सेलेब्रेटी प्रमोशनसाठी येणार नाहीयत. तरीही ‘लाफ्टर शेफ’चे कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी हे विकेंडच्या वारला येऊन मनोरंजन करणार असल्याची माहिती आहे. ते सर्व स्पर्धकांसोबत विविध खेळ खेळणार आहेत.

दरम्यान, सलमान खान याने चित्रिकरण सुरु केलं असलं तरी त्याच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. सलमानच्या कंपाउंडमध्ये कोणालाही परवानगी नाहीय. कुणी येत जरी असलं तरी त्याची खूप तपासणी केली जाणार आहे. त्याला आधारकार्डशिवाय आतमध्ये सोडलं जाणार नाही. तसेच बिग बॉसच्या क्रू ला देखील चित्रिकरण संपण्याआधी सेटच्या बाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सलमान खानच्या सुरक्षेसाठी बिग बॉसच्या सेटवर तब्बल 60 पेक्षा जास्त जण आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article