आर्य चाणक्य ही जगातील एक थोर कुटनीतीतज्ज्ञ म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती होती. श्रेष्ठ विद्वान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अर्थतज्ज्ञ आणि सल्लागार म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. नीतीशास्त्रात मोलाची भर घालण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी सांगितलेले मार्ग, वचन आणि नीतीमूल्य आजही जसेच्या तसे लागू होतात. त्यांचे काही विचार कालबाह्य झालेले असले तरी सर्वच विचार टाकून देता येतील असं नाही. त्यांचा मानवी स्वभाव आणि मानवी व्यवहारावरही मोठा अभ्यास होता. त्यामुळेच त्यांनी गृहस्थी जीवनावर अमूलाग्र चिंतन केलं आहे. त्यांचं हे चिंतन आजही जसेच्या तसे लागू होते.
चाणक्य यांनी दिलेल्या नीती नियमांचे पालन केल्यास व्यक्ती निश्चितपणे यशस्वी होतो. म्हणूनच, आज अनेक वर्षे उलटली तरी चाणक्य यांच्या या नीती आणि श्लोकांची प्रासंगिकता आजही कायम आहे. चाणक्य स्त्रियांचे काही गुण सांगतात, पुरुषांपेक्षाही स्त्रीया किती श्रेष्ठ आहेत हे त्यातून दिसून येतं. चला तर मग, चाणक्य यांनी सांगितलेले स्त्रियांमधील हे गुण जाणून घेऊया.
स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोSष्टगुण उच्यते।।
हे सुद्धा वाचा
चाणक्य यांच्या या श्लोकानुसार, भूक, लाज, साहस आणि कामाच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ असतात.
स्त्रीणां द्विगुण आहारो
चाणक्य म्हणतात की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना दोन पट जास्त भूक लागते. म्हणूनच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त खातात. हे त्यांचे शारीरिक रचनेमुळे होते. त्यामुळे त्यांना अधिक अन्नाची आवश्यकता असते.
बुद्धिस्तासां चतुर्गुणा
चाणक्य म्हणतात की, स्त्रिया बुद्धिमान असतात आणि यामध्येही त्या पुरुषांपेक्षा चार पट अधिक असतात. याशिवाय, स्त्रिया चतुर आणि समजदार असतात, त्यामुळे त्या प्रत्येक अडचणीला सहजपणे तोंड देऊ शकतात.
साहसं षड्गुणं
याचा अर्थ, साहसाच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धाडसी आहेत. चाणक्य म्हणतात की, साहसाच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा सहा पट अधिक असतात.
कामोSष्टगुण उच्यते।।
चाणक्य म्हणतात की, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक कामुकतेची भावना असते. त्या पुरुषांपेक्षा आठ पट अधिक कामुक असतात.