आपल्या हिंदू धर्मात कापूरला खूप महत्त्व आहे. तसेच कापूरचा वापर हा जास्त करून पूजेसाठी केला जातो. शतकानुशतके आध्यात्मिक आणि उपासना करण्यात कापूर वापरला जात आहे. तसेच घरात व पूजे ठिकाणी हवनात कापूर जाळ्याने वातावरणात असणारे छोटे छोटे जंतू ज्याच्या आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो असे देखील नष्ट होऊन जातात. व वातावरण शुद्ध होते. त्यामुळे लोकांना आजारापासून मुक्तता मिळते. याशिवाय ज्योतिषशास्त्रातही कापूरचा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर ही पूजेच्या अत्यावश्यक वस्तूंपैकी एक आहे.
कपूरमध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकणारी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी पवित्र शक्ती असल्याचे मानले जाते. कापूरमध्ये असेच काही चमत्कारिक उपाय आहेत. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येऊ शकते. याशिवाय कापूर वाईट ग्रहांचा प्रभाव देखील कमी करतो.
कापूरने करा हे उपाय
वास्तुमध्येही कापूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष ताबडतोब दूर होतो. वास्तुदोष संपल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो त्या घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत.
ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्याच्या घराच्या आजूबाजूला सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा फिरत असते. अशा तऱ्हेने मुले घाबरून जातात. याकरिता मुलांच्या आसपास या वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये म्हणून रोज संध्याकाळी कापूरचे काही तुकडे जाळले पाहिजेत .
ज्या लोकांना रोज रात्री भयानक भीत वाटणारे स्वप्न पडत असतात त्यांनी यापासून सुटका मिळवण्यासाठी रात्री बेडरूम मध्ये किंवा तुम्ही झोपता त्या ठिकाणी कापूर जाळावे. अश्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडत नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष आणि राहू दोष असेल तर कापूरचे तुकडे सकाळ-संध्याकाळ जाळणे फायदेशीर ठरते.
रोज संध्याकाळी कापूर जाळून त्याचा धूर घराच्या कानाकोपऱ्यात पसरावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत कापूर जाळून ठेवा. यामुळे वाईट स्वप्ने पडणार नाहीत आणि झोप चांगली येईल.
दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर कापूर जाळावा. कापूर जाळ्याने घरात धूर झाल्यावर त्या धुरात घरातील सर्व मंडळी उभं राहावे. अश्याने तुम्हाला कोणत्याही आजार होत नाही तसेच पैसे मिळण्यात कोणतेही अडथळे दूर होतात. देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कापूर प्रज्वलित करून दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात धन येईल.
कापूर जाळण्याचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की पूजेमध्ये कापूरने आरती केल्यास देवी-देवता प्रसन्न होतात. कपूरची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. ज्या घरांमध्ये रोज कापूरने आरती केली जाते, तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा असते. कापूरची आरती, हवन यातून निघणारी ऊर्जा वाईट शक्तींचा नाश करण्यास सक्षम आहे. ज्या घरांमध्ये रोज कापूरने आरती केली जाते. त्या घरांमध्ये आनंद असतो आणि लोकांना कोणत्याही प्रकारचे दु:ख होत नाही आणि आयुष्यात पैशांची कधीच कमतरता भासत नाही.