रिसोड(Latur) :- नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक (Election)निकालामध्ये भाजपा संघठीत युतीला अभुतपुर्व यश प्राप्त झाले. त्यातुन भाजपा कार्यकर्त्यांना अपुर्व आनंद झाला. निवडणुकीच्या नियोजनाच्या संदर्भात शिस्तबद्धपणे प्रचार यंत्रणा राबवुन घर घर मोदी, व विकासाच्या महायुतीचा अजेंडा यशस्वी होणे राबविला. त्यामुळे अभुत पुर्व यश महायुतीला मिळाले.
महाराष्ट्रात विकासाचे मुख्य स्तोत्र म्हणजे देवेंद्रजी फडणवीस
शहरातील अनेक कार्यकर्त्यांच्या इच्छा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) शांत संयमी व विकासाचे सम्यक दृष्टी त्यांच्याकडे आहे.तसेच आधुनिक महाराष्ट्राचे ऊर्जावान विकास पुरुष म्हणुन देवेंद्रजी कडे महारष्ट्रा मधील प्रत्येक जनसामान्य माणसासह भाजपचा कार्यकर्ता पाहत आलेला आहे.भविष्यकालीन व्हिजन असलेले लोकनेते असल्यामुळे तेच प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना बोलून दाखविले.तर भाजपा उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की पंधरा वर्षांपुर्वी “मी पाहिलेले मुख्यमंत्री ” या पुस्तकाचे लेखन केले होते.देवेंद्र भाऊ जनसामान्यांचा आवाज आहेत. लाडक्या बहिणींचा लाडके देवा भाऊ आहे.विकासाची दृष्टी असलेले एक एक गतिमान नेतृत्व आहे.म्हणुन महाराष्ट्राचे पुनश्च एकदा मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणुन देवेंद्र फडणवीस च यांनी या राज्याची धुरा सांभाळावी असे मला व संपुर्ण राज्यातील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनोमन वाटते.