लोहामध्ये मतदान व मतमोजणीमध्ये तफावत नसल्याचे अरुणा संगेवार यांनी सांगितले. File Photo
Published on
:
26 Nov 2024, 2:11 pm
Updated on
:
26 Nov 2024, 2:11 pm
लोहा: पुढारी वृत्तसेवा : लोहा (८८) विधानसभा मतदार संघात ३३८ मतदान केंद्र व ३ लक्ष १ हजार ६५० मतदार होते. ईव्हीएम वर प्रत्यक्ष झालेले मतदान व झालेली मतमोजणी यात कोणतीही तफावत नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
20 नोव्हेंबररोजी मतदानाचे प्रक्रिया पार पडली. २ लक्ष २६ हजार ९९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. मतदारांनी सर्व 338 मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान बजावले मतदान झाल्यानंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदान केंद्र निहाय आकडेवारीत मानवी चुक होऊन मतदान केंद्र क्रमांक 319 मध्ये प्रत्यक्ष मतदान यंत्रावर झालेले मतदान 675 आहे. पण 521 असा मतदानाचा आकडा प्रसिध्द झाला होता.
मतदान यंत्रासोबत संबंधित मतदान केंद्राध्यक्ष यांचा नमुना 17- C (नोंदविलेल्या मतांचा हिशेब) मध्ये एकूण 675 मतदान झाल्याचे नोंद आहे. मतमोजणी दरम्यान नमुना 17- C भाग-एक मध्ये नोंदविलेले मतदान व नियंत्रण युनिट (मतदान यंत्र) मधील मतदान 675 असुन ते जुळलेले आहे. त्यामुळे लोहा विधानसभा मतदारसंघात EVM यंत्रावर झालेले एकूण मतदान (नोटा सह) 2 लक्ष 26 हजार 991 व मतमोजणी मध्ये उमेदवार निहाय झालेली मतमोजणी (नोटा सह) 2 लक्ष 26 हजार 991 एवढ्या मतांची झालेली आहे.