महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांत ( Assembly Election ) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. या भाजपाला सर्वाधिक १३२ जागा मिळालेल्या आहेत. या निवडणूकांची अभूतपूर्व यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आता येत्या २९ नोव्हेंबर रोजी राज्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.आम्ही ज्योतिषशास्राच्या नजरेने शपथविधीच्या दिवशी ग्रहांची स्थिती काय असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.ज्यामुळे येणाऱ्या सरकारच्या कामाकाजाबद्दल आपल्याला काही आडाखे बांधता येतील.
शपथ ग्रहणाच्या दिवशी ग्रहांची काय स्थिती –
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजताची कुंडली पाहाता मिथुन लग्नाच्या कुंडलीत लग्नेश बुध, सुर्य सोबत सहाव्या घरात विराजमान असतील. मंगळ आपल्या निच्चतम राशी कर्क मध्ये दुसऱ्या घरात असेल. चंद्र केतू सोबत युती करुन चतुर्थस्थानात, शुक्र सातव्या घरात, तर शनि नवव्या स्थानात आणि राहु दहाव्या घरात तर गुरु दहाव्या घरात असेल. चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल तसेच दहाव्या घरात राहुचा प्रभाव आणि चौथ्या घरात चंद्र आणि केतूची युती तसेच लग्नेश बुध याची सहाव्या घरातील उपस्थिती काही असामान्य स्थिती दर्शवत आहे.या स्थितीला पाहाता सरकारला येत्या भविष्यात काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात महायुतीत काही मतभेद होण्याची तर काही जण विरोधकांत सामील होण्याची शक्यता आहे.
नवाच चेहरा देखील येऊ शकतो
काही लोकांची नावे अशा गैरकारभारात येऊ शकतात ज्यामुळे त्यांची आमदारकी देखील संकटात येऊ शकते. या शपथ सोहळ्यात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासाठी कसोठीचा काळ असणार आहे. कारण त्यांची एकीकडे मुख्यमंत्री म्हणून प्रमुख दावेदारी असतानाही काही परिस्थितीमुळे अंतिम निर्णय घेताना त्यांच्यासाठी कसोटी आणि परीक्षेचा काळ असणार आहे. त्यांना कदाचित मुख्यमंत्री पदाऐवजी दुसरी मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. आणि मुख्यमंत्री पदी कोणी नवाच चेहरा देखील येऊ शकतो.
हे सुद्धा वाचा
संघर्षाचा सामना करावा लागू शकतो
एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना देखील काही मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. त्यांना कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. चंद्र केतू सोबत चौथ्या स्थानात दूषित होणे यामुळे अनेक घटक पक्षात आपसात असंतोष बळावू शकतो. काही विरोधक प्रबळ होऊ शकतात त्यामुळे पक्षांना संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. सरकार जरुर महायुतीचे असेल परंतू येत्या काळात सत्तेचा काटेरी मुकूट भाळी असणार असून दोन वर्षात प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. काही समस्या सरकार चालवताना येऊ शकतात. आमच्या शुभेच्छा सरकार सोबत आहेतच. आम्हाला वाटते की महाराष्ट्रात एक चांगले आणि मजबूत सरकार सत्तेत येवो, त्यांनी जनतेची योग्य काळजी घेणारे निर्णय घ्यावेत आणि जनतेचे कल्याण करावे.