जगातील सर्वात जास्त प्रॉफीट कमविणाऱ्या कंपन्यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा आपल्या मनात एप्पल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांने नाव समोर येते. त्यानंतर आपण विचार करतो की ज्या देशाची अर्थव्यवस्था मोठी, जो देश सर्वात पॉवरफुल त्याच देशाची कंपनी सर्वात जास्त नफा कमवित असेल. परंतू असे नाही. चला तर पाहूयात जगात कोणती कंपनी सर्वात नफा कमविते ते पाहूयात….
कोणती आहे ही कंपनी ?
आम्ही ज्या कंपनीची गोष्ट सांगत आहोत ती कंपनी आहे सौदी अरामको ( Saudi Aramco ) आहे. तेल उत्पादन करणारी ही कंपनी सौदी अरब येथील धाहराण येथे आहे. या कंपनीने नफ्याच्या बाबतीत जगातील बड्या कंपन्यांना देखील पाटी टाकले आहे. एप्पल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या देखील या मुस्लीम देशातील कंपनीची या बाबती बरोबरी करु शकत नाहीत.
किती कमावले प्रॉफीट
स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार तेल आणि ऊर्जा क्षेत्रात काम करणारी सौदी अरब सरकारची कंपनी सौदी अरामको हीने साल २०२३ मध्ये २४७.४३ अब्ज युएस डॉलरचा नका कमावला आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एप्पल कंपनीने ११४.३ अब्ज युएस डॉलरचा नफा कमावला आहे. तिसऱ्या क्रमांकावर बर्कशायर हॅथवे कंपनी आहे. या कंपनीने साल २०२३ मध्ये १००.३ अब्ज डॉलरचा नफा कमावला आहे.तर दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टचा नंबर या यादीत चौथा आहे. मायक्रोसॉफ्टने साल २०२३ मध्ये ९५.०२ अब्ज युएस डॉलर नफा कमावला आहे. या यादीत पाचवा नंबर अल्फाबेट कंपनीचा आहे. गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटने २०२३ मध्ये ७८.७८ अब्ज युएस डॉलरचा नफा कमावला आहे.
सौदी अरामको कंपनीचा मालक कोण ?
सौदी अरामको ( Saudi Aramco ) ही कंपनी सौदी अरब सरकारच्या मालकीची आहे. ही कंपनी संपूर्णपण सरकारी मालकीची आहे. आणि सौदी अरब देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. सौदी अरामको कंपनीचे संपूर्ण नाव सौदी अरेबियन ऑईल कंपनी ( Saudi Arabian Oil Company ) आहे. ही जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादन आणि ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे.
अरामको तेल – गॅस उत्पादन, संशोधन आणि वितरणांशी संबंधित कामे करते. या कंपनीचे संचालन आणि व्यवस्थापन सौदी अरब सरकार करते. साल २०१९ मध्ये या कंपनीचा छोटा भाग सार्वजनिक केला गेला. आणि त्याला रियाल स्टॉक एक्सचेंजवर ( Tadawul ) लिस्टींग केले होते. आजच्या तारखेला या रियाद स्टॉक एक्सचेंजमध्ये याच्या शेअरचा भाव २७.५० सौदी अरेबियन रियाल आहे.