लाचखोर मनोज मगरे याच्या निवासस्थानी सापडले 14 तोळे सोने:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

1 hour ago 1
हिंगोली येथील केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधिक्षक मनोज मगरे याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घर झडतीमध्ये त्याच्या घरी एका कार, दोन दुचाकी, १४ तोळे सोने व ५६ हजार रुपये रोख आढळून आले आहेत. पुणे येथील खराडी भागातील घराची रजिष्ट्रीही सापडली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. हिंगोलीच्या केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधिक्षक मनोज मगरे यास एका तक्रारदाराकडून त्यांच्या कंपनीची नोंदणी रद्द न करण्यासाठी प्रस्ताव पाठविला नसल्याचे सांगत १० हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विनायक जाधव यांच्या पथकाने त्याला सोमवारी ता. २५ रंगेहात पकडले होते. त्याला मंगळवारी ता. २६ न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याच्या अधिक चौकशीमध्ये तो वयाच्या २० व्या वर्षी अनुकंपा तत्वावर केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयात लिपीक पदावर रुजू झाला होता. त्याची २९ वर्ष सेवा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील शहानुरवाडी भागातील घराची लाचलुचपतच्या पथकाने तपासणी केली. यामध्ये त्याच्या घरी एक कार, दोन दुचाकी आढळून आल्या. तसेच घरात १४ तोळे सोने, ५६ हजार रुपये रोख व पुणे येथील खराडी भागातील फ्लॅटची रजिष्ट्री आढळून आली आहे. या शिवाय पोलिसांनी आता अधिक चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर व हिंगोली येथील सर्व बँकांना पत्र देऊन त्याच्या बँक खात्याची माहिती घेण्याची तयारी सुरु केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article