रिसोड (Jaipur Food Camp) : प्रसिद्ध उद्योगपती श्री मधुसूदनजी अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन द्वारा संचालित संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर रोजी जयपुर फूट कॅम्प उद्घाटन करण्यात आले. (Jaipur Food Camp) जयपुर फूड कॅम्प चे उद्घाटन श्री उत्तमचंद बगडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे सदस्य श्री नारायण व्यास, संजय उकळकर, संतोष वाघमारे डॉ अजय पाटील, प्राचार्य विनोद कुलकर्णी, विपिन शर्मा उपस्थित होते.
नारायण व्यास यांनी भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीमार्फत आतापर्यंत सात लक्ष रुग्णांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले असून समाजात दुर्लक्षित असणाऱ्या या विकलांग लोकांना ही संस्था एक नवीन आशेचा किरण असल्याचे सांगितले. संजय उकळकर यांनी ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन तर्फे चालविण्यात जाणाऱ्या आरोग्य कॅम्पची माहिती दिली व रिसोड करांनी अशा कॅम्पचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये उत्तमचंद बगडिया यांनी मधुसूदन अग्रवाल यांच्या रोगमुक्त रिसोड अभियानाची माहिती दिली व (Jaipur Food Camp) जयपुर फूट कॅम्पचा विकलांग लोकांनी अधिकाधिक फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉक्टर अजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जयपुर फूट कॅम्पचे आयोजन ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन द्वारा संचलित संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे करण्यात आले आहे. (Jaipur Food Camp) जयपुर फूट हे एक स्वस्त, मजबूत व हलके कृत्रिम अवयव आहेत जे विशेषतः भारतीय गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले गेले आहे. सदर व कॅम्प हा 26 ते 29 नोव्हेंबर पर्यंत असेल कॅम्पच्या पहिल्या दिवशी 70 रुग्णांनी कृत्रिम अवयव करिता नोंदणी केली. जयपुर फूट कॅम्प मध्ये गरजू अपंग व्यक्तींना कृत्रिम पाय विनामूल्य पुरवले जाणार आहेत.
जयपुर फूट कॅम्पमध्ये (Jaipur Food Camp) २६ ते २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत श्री उत्तमचंदजी बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये अपंग व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या अवयाचे माप घेतले जाणार आहे. मोजणी केलेल्या मापाप्रमाणे कृत्रिम अवयव कॅम्प मधील वर्कशॉप मध्ये तयार करून रुग्णांना बसवून देण्यात येतील . कॅम्पमध्ये नाव नोंदणी, चाचणी आणि फिटिंग तसेच निवड झालेल्या रुग्णांसाठी जेवणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे वाहन ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचे अध्यक्ष मधुसूदनजी अग्रवाल यांनी केले आहे.