राज्यसभेच्या सहा जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान; ECI कडून निवडणूक अधिसूचना जारी

2 hours ago 1

राज्यसभेच्या सहा जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. आंध्र प्रदेशात तीन आणि ओडिशा, हरयाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.

Election Commission of India releases notification for the 6 vacant seats of Rajya Sabha. Elections will be held on 20th December and results will also be declared on the same day. pic.twitter.com/5EYrfOYY1p

— ANI (@ANI) November 26, 2024

या निवडणुकीसाठी 10 डिसेंबर ही नामांकनाची अंतिम तारीख आहे. तर 11 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 13 डिसेंबरपर्यंत नावे मागे घेण्याची मुदत आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article