परभणी(Parbhani) :- शहरातील गंगाखेड रोडवरील रुची हॉटेल (Hotel)येथे जेवण केल्यानंतर व्यवस्थापकाने संबंधितांना बिल मागितले. तु आम्हाला बिल मागतो का, असे म्हणत हॉटेल व्यवस्थापक आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच हॉटेलच्या काचा फोडून पाच हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. ही घटना रविवार रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी २५ नोव्हेंबरला कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील घटना
गगन जैस्वाल यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे गंगाखेड रोडवरील एका हॉटेलवर व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. त्यांचा भाऊ मदतणीस म्हणून याच ठिकाणी कामाला आहे. २४ नोव्हेंबरच्या रात्री काही ग्राहक हॉटेलवर आले. त्यांनी ऑर्डर दिली. जेवण झाल्यानंतर व्यवस्थापकाने संबंधितांना बिलाची मागणी केली. यावर त्यांनी बिलाची रक्कम देत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत धमकी दिली. बिल मागितल्यावर शिवीगाळ केली. तसेच हॉटेलच्या खिडक्यांचे काच फोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी हरिजीतसिंग विक्रमसिंग जुन्नी, लाखनसिंग निहालसिंग टाक, गोरासिंग गुरुबच्चनसिंग दुधाणी या तिघांवर कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.