पहिल्या एकदिवसीय सामन्यातील 80 धावांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानने झिंबाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत धमाकेदार कमबॅक केलं आहे. पाकिस्तानने झिंबाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या आणि ‘करो या मरो’ सामन्यात 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. झिंबाब्वेने पाकिस्तानला 146 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या सलामी जोडीनेच हे आव्हान सहज पूर्ण केलं. पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात उभयसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
सॅम अय्युबचं स्फोटक शतक
पाकिस्तानने हे 146 धावांचं आव्हान 18.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. सॅम अय्युब आणि अब्दुल्लाह शफीक हे दोघे पाकिस्तानच्या विजयाचे नायक ठरले. सॅम आणि अब्दुल्लाह या सलामी जोडीने नाबाद 148 धावांची सलामी भागीदारी केली. सॅमने या भागीदारीदरम्यान स्फोटक शतकी खेळी केली. सॅमने 62 बॉलमध्ये 17 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नॉट आऊट 113 धावा केल्या. तर अब्दुल्लाह याने नाबाद 32 धावा करत सॅमला अप्रतिम साथ दिली.
झिंब्बावेची बॅटिंग
झिंबाब्वेने टॉस जिंकला. कॅप्टन क्रेग एर्विन याने बॅटिंगचा निर्णय केला. मात्र झिंबाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. झिंबाब्वेकडून डिओन मायर्स 33 आणि सीन विलियमन्स याने 31 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर कुणालाही 20 पेक्षाही पुढे पोहचता आलं नाही. पाकिस्तानने झिंबाब्वेला 32.3 ओव्हरमध्ये 145 धावांवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानसाठी अब्रार अहमद याने 4 विकेट्स घेतल्या. आघा सलमान याने 3 विकेट्स मिळवल्या. तर सॅम अय्युब आणि फैसल अक्रम या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तानचा 10 विकेट्सने विजय
The @SaimAyub7 tempest helps Pakistan cruise to an emphatic 🔟-wicket triumph successful the 2nd ODI! 🙌
The bid decider volition instrumentality spot connected Thursday 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/73srWTUF5H
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन : क्रेग एर्विन (कर्णधार), जॉयलॉर्ड गुम्बी, तदिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, ब्रायन बेनेट, ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि ट्रेव्हर ग्वांडू.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर) सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, आगा सलमान, तय्यब ताहिर, इरफान खान, आमेर जमाल, हरिस रौफ, फैसल अक्रम आणि अबरार अहमद.