Chandrapur: विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस पलटली..!

1 hour ago 1

कोरपणा (Chandrapur):- राजुरा गोविंदपूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ चे काम प्रगतीपतावर असून रस्ता उंच झालेला आहेत. यात आज हरदोना गावाजवळ गडचांदूर येथील लालबहादूर शास्त्री शाळेची बस(School Bus) क्र एम एच ३४ ए, बी ८०४० या बस मध्ये विद्यार्थी भरून जातं असताना अचानक पलटी झाल्याची सकाळी १० वाजताच्या सुमारास घटना घडली. यात त्या स्कूल बस ने दोन ते तीन पलटी घेतल्याने मोठी दुर्घटना(accident) टळली असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून बस मध्ये असलेले काही विद्यार्थी किरकोळ जखमी(Injured) झाल्याची प्राथमिक माहिती आहेत.

काही विद्यार्थी किरकोळ जखमी

याबाबत गडचांदूर पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार शिवाजी कदम यांना माहिती मिळताच घटनेचे गाभीर्य जाणून धाव घेऊन जखमी विद्यार्थी यांना उपचारर्थ ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे पाठविण्यात आले. या घटनेने पालक वर्गात एकच भीती असल्याने मोठ्या प्रमाणात पालक वर्गासह नागरिक त्या ठिकाणी एकत्र येत पाहन्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस ही वारंवार बंद पडत असल्याची व बस मध्ये अनेक तांत्रिक बिघाड असल्याची माहिती बस चालका सह पालकांनी व्यक्त केली. प्रशासनाकडून जखमी विदयार्थ्यांना रुग्णालयात हलविण्या करिता तात्काळ रुग्णावाहीका (Ambulance) दाखल झाल्या असून उपचारासाठी रवाना करण्यात आले.

शिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

तालुक्यात अनेक खाजगी शाळेचा बाजार होत असताना तालुका शिक्षण अधिकारी यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते सुदैवाने आजच्या घटनेत मोठी दुर्घटना टळली मात्र तालुक्यात अनेक खाजगी शाळा कार्यरत असून यात शाळेच्या विदयार्थी यांना पोहचविण्यात येणाऱ्या बसेस ची तपासणी व त्या बसेस कशा यावर शिक्षण अधिकऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहेत याबाबत तालुका शिक्षण अधिकारी सचिन कुमार मालवी यांचेशी संपर्क साधला असता शाळेच्या समितीत परिवहन विभागाचे एक दोन पोलीस कर्मचारी सुद्धा समिती मध्ये असतात शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत ने आन करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या बसेस बाबत शाळेला याअगोदर सूचना केल्या होत्या. याआधी आपण तालुक्यातील शाळेला अशा प्रकारचे लेखी पत्र दिले का? पत्र नाही सूचना दिल्या असे व्यक्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article