भाजपचे उद्या महाजनसंपर्क अभियान:नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह ३२ हजार कार्यकर्ते मैदानात

2 hours ago 1
लोकसभेच्या निवडणुकीत घटलेल्या मतदानाचा आणि मताधिक्याच्या टक्केवारीने भाजपने चांगलीच धास्ती घेतली आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपने कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. रोज भूमिपूजन, उद्‍घाटनाचे कार्यक्रम होत असताना आता उद्या रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे तब्बल ३२ हजार कार्यकर्ते घरोघरी संपर्क साधणार आहे. उद्या रविवारी भाजपचे नागपूरमधून महाजनसंपर्क अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप आपल्या प्रचाराचा श्री गणेशा करणार आहे. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपचे नेते, पदाधिकारी, प्रभारी, प्रवासी कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्ते दहा वर्षांच्या केंद्र आणि राज्य शासनाचे विकासाचे प्रगतीपुस्तक घेवून घरोघधरी जाणार आहेत. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्यांना विधानसभेत मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. नागरिकांच्या समस्या, अडचणींची नोंद घेतली जाणार आहे तसेच मतदार याद्यांमधील नावांची प्रत्येकाच्या घरी जावून खातरजमा केली जाणार असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी सांगितले. नागपूर शहरात २१५८ बुथ आहेत. भाजपचे तेवढेच बुथ प्रमुख आहेत. ७३४ शक्ती केंद्र आणि प्रमुख आहेत. ५३०० पदाधिकारी, सहप्रभारी शक्ती प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य असे एकूण ३२ हजार कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहे. पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बुथवर भेटी देणार आहेत. देवेंद्र फडणवीस आपल्या दक्षिण-पश्चिम, उत्तर नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, यांच्या सर्व आजी-माजी आमदार आपआपल्या मतदारसंघातील अभियानानात सहभागी होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने ७५ टक्के मतदानाचा संकल्प केला होता. नितीन गडकरी यांनीसुद्धा मतदान करण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र ५५ टक्के मतदान झाले होते. या दरम्यान मतदार याद्यांमधील घोळ मोठ्या प्रमाणात समोर आला होता. जवळपास पावणे दोन लाख मतदारांचा सुधारित मतदान यादीत समावेश करण्यात आला आहे. लोकसभेच्या दरम्यान भाजपने १३ लाख मतदारांचा मोबाईलाचा डाटा गोळा केला असल्याचे बंटी कुकडे यांनी सांगितले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी, संजय बंगाले आदी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article