Published on
:
05 Oct 2024, 3:19 pm
Updated on
:
05 Oct 2024, 3:19 pm
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि.5) अपघात झाला. या अपघातात किशन गणपतराव कदम यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी ६ वाजता चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.
नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर हिवरा फाटा येथे सायंकाळी सहा वाजता किशन गणपतराव कदम राहणार हिवरा हे आपल्या दुचाकीने हिंगोलीकडून गावाकडे जात होते. यावेळी हिवरा पाटीवर दुचाकी गावाच्या दिशेने घेत असताना त्यांना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी गाडी क्रमांक (एमएच २६ सीएच ११६२) यांनी पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमध्ये त्यांच्या डोक्याला जबर धक्का लागला. यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने अर्धापूरकडे घेऊन जात असताना मृत्यू झाला.
अपघाताची माहिती कळतात डोंगरकडा पोलीस चौकीची जमादार नागोराव बाबळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. डोंगरकडा येथील आनंद अडकिने यांनी अपघात स्थळी जाऊन अपघातातील रुग्णांना रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली व वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.