आईने मोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही:मुलीने उचलले टोकाचे पाऊल

2 hours ago 1
गेल्या तीन दिवसांपासून आई मोबाईलचा पासवर्ड सांगत नसल्याने रुसलेल्या एका तेरा वर्षीय मुलीने आज, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास गळ‌फास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील निंबोली येथे घडली. कृशिका काळूराम हटकर असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता सातवीत शिकत होती. घरी आलेल्या बकऱ्या कुणीच बांधत नाही, हे लक्षात आल्यावर घरमालकाने घरात जाऊन पाहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास ठाणेदार गौतम इंगळे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृशिकाने गुलाबी ओढणीने गळफास घेतला. या मुलीची आई हातमजुरीचे काम करते. ती गेल्या तीन दिवसांपासूनन मोबाईलचा पासवर्ड सतत बदलत होती. त्यामुळे दोघींमध्ये कुरबुर सुरु होती. आईच्या या कृतीमुळे कृृशिकाला मोबाईल वापरणे अशक्य झाले होते. दरम्यान आज सकाळी कामावर असलेल्या कृशिकाच्या आईचा घरी मोबाईलवर फोन आला व तिने कृशिका हिला बकऱ्या बांधून घेशील, असे सांगितले. त्यावेळीसुध्दा कृशिकाने मोबाईलचा पासवर्ड दे अन्यथा आत्महत्या करीन असे म्हटले होते. काही वेळाने बकऱ्या घरी आल्या तरीही कोणीच बांधत नसल्याचे पाहून घरमालक घरात गेले असता सदरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कृशिकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला होता. त्यानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. सदर प्रकरणातील मोबाईल मंगरुळ दस्तगीर पोलीसांनी जप्त केला असून त्याचा पासवर्ड दिल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुळ मुंबईचे रहिवासी असलेल्या कृशिका हटकरची आई कोरोना काळात आपल्या आई व दोन भावंडांसोबत निंबोली येथे परत आली असूनन तेव्हापासून निंबोली येथेच वास्तव्यास आहे. मोबाईलच्या हव्यासापोटी एका लहान मुलीचा जीव गेल्याने निंबोलीवासियांनी हळहळ व्यक्त केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article