नागपुरात आशियातील पहिला 4 स्तरीय डबल डेकर उड्डाणपूल:नितीन गडकरी यांच्या हस्ते एलआयसी ते ऑटोमॅटिव्ह चौक डबल डेकर उड्डाणपूलाचे लोकार्पण

2 hours ago 1
जे देशात नाही, आशियात नाही ते नागपूरमध्ये आहे. अजनी चौक ते एअरपोर्ट हा डबल डेकर उड्डाणपूल, पूर्व नागपूरच्या पारडीमध्ये असणारा डबल-डेकर पूल आणि आता नागपुरातील एलआयसी ते ऑटोमॅटिव्ह चौक पर्यंत असलेला तिसरा डबल डेकर पूल आशियातील चार स्तरीय वाहतूक असणारा पहिला डबल डेकर पूल ठरला आहे. या पुलामुळे कामठी आणि छिंदवाडा रोडवरील वाहतूक सुरळीत तसेच अपघात मुक्त होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्थानिक एलआयसी चौकामध्ये आयोजित या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. याप्रसंगी नितीन गडकरी यांनी या उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान अंतर्गत निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच भूसंपादनाचे अवघड काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांचे देखील त्यांनी आभार मानले. केंद्रीय रस्ते निधीतून कामठी रोड हा सिमेंट काँक्रीटचा करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर शहर हे आपल्या नवनवीन उपक्रमासोबतच वाडी फ्लायओवर, रवी नगर येथील फ्लायओवर अशा नवीन पुलासोबत नागपूर हे फ्लायओवरचे शहर म्हणून देखील ओळखण्यात येत आहे, असे गडकरी यांनी सांगितले. महा मेट्रो आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आशियातील सर्वात लांब डबल डेकर मार्गांपैकी एक आहे. ८९७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलामध्ये केवळ डबल डेकर पुलाचा खर्च ५७३ कोटी रुपये आहे. ५.६ किमी लांबीच्या ४-लेन कामठी रोडवर असणाऱ्या या डबल डेकर उड्डाणपुलाच्या संरचनेत रिब आणि स्पाइन या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे नैसर्गिक प्रकाश आणि हवा पुरेशा प्रमाणात उड्डाणपुलामध्ये येऊ शकते, असेही नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article