चिखली/बुलढाणा (Buldhana) :- गेल्या चार दिवसापासून बेपत्ता इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत चिचखेड शिवारातील एका शेतकऱ्यांच्या शेतातील मकाच्या पिका मध्ये आढळून आले होते . परंतु हा खून (Murder) की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला होता . या घटनेची बातमी दै देशोंनती मध्ये १९ सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती.
शेताला विजेच्या ताराचे कुंपण करणे भोवले
याप्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरली असता अखेर शेत मालकाने पिकाच्या संरक्षणासाठी शेताला विजेच्या ताराचे कुंपण केले होते . मात्र या विजेच्या ताराला मृतक विजय रामा जाधव वय ३५ वर्ष यांचा स्पर्श होवुन त्यांचा मृत्यु झाला त्यामुळे श्रीमती नंदा विजय जाधव वय ३० वर्ष रा. चिंचखेड यांच्या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रामेश्वर आंधळे यांनी आरोपी किशोर भास्कर वायाळ रा चिंचखेड यांच्या विरूध्द कलम 105,238 BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे .