घर व कार घेण्यासाठी विवाहितेचा छळfile
Published on
:
16 Nov 2024, 5:13 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:13 am
रायगड ः ठाणे जिल्ह्यातील म्हारळ येथे घर व कार घेण्यासाठी विवाहित महिला पूजा रूपेश आयरे (वय-33 वर्ष, रा.झिराड, ता. अलिबाग) यांचा छळ केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत 19 मे 2019 ते 5 मे 2024 दरम्यान ही घटना घडली आहे. महिला फिर्यादी पूजा आयरे यांचे रुपेश आयरे यांचेसोबत 19 मे 2019 रोजी लग्न झालेपासून ते 5 मे 2024 रोजीपर्यंत पूजा आयरे यांस त्यांचे पती रुपेश आयरे, सासु सुवर्णा आयरे, सासरे नारायण आयरे व नंणद वृषाली माने यांनी वेळोवेळी फिर्यादी यांचे आई वडीलांकडुन घर व कार घेण्यासाठी पैशाची मागणी करून मारहाण व शिवीगाळी करुन तक्रारदार यांस वारंवार शारिरीक, मानसीक व आर्थिक त्रास देवुन छळ केला.
याबाबत मांडवा सागरी ठाणे पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महीला पोलिस हवालदार अस्मिता करवाडे या करीत आहेत.