अंबादास दानवेंचा दुचाकीवर प्रचार:छत्रपती संभाजीनगरच्या अजबनगर ते क्रांती चौकात मारली फेरी

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्यात निवडणुकीची रंगत वाढली आहे. प्रचार करण्याचे नव नवे फंडे राजकीय पक्षाकडून राबविले जात असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुचाकीवर प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. विरोधी पक्षनेते म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो भला मोठा ताफा पण सामान्य शिवसैनिकांप्रमाणे अंबादास दानवे यांनी एका दुचाकीवर पक्षाचे निवडणूक चिन्ह लावत प्रचार केला आहे. तसा संभाजीनगरच्या लोकांना शिवसेनेचा दुचाकीवरील प्रचार काही नवा नाही. पण दरवेळेस शिवसेनेचा दुचाकीवर प्रचार करणारे बंडू ओक हे स्वत: यंदा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यातच आता अंबादास दानवे देखील दुचाकीवर प्रचार करत मतदारांपर्यंत पोहचत आहे. सरकारचे मराठवाड्यावर पूर्ण दुर्लक्ष अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील सरकारने मराठवाडा आणि संभाजीनगरकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यावेळी जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदार संघात महाविकास आाघाडीचे उमेदवार निवडून देऊन विकासासाठी मतदारांनी आघाडीला भरभरुन आशिर्वाद द्यावे. आज दुचाकीवर प्रचार करुन पुन्हा कॉलेज जीवनाची आठवण आली. आमच्यासाठी चारचाकी अन् दुचाकी यापेक्षा महत्त्वाचा आमचा पक्ष आहे. 5 आमदार गेले शिंदेंसोबत शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर संभाजीनगरमधील शिवसेनेचे 5 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यातच अंबादास दानवेंकडे विरोधी पक्षनेतेपद असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे ही निवडणूक ठाकरे गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मोदींचे भाषण अन् भाजपची तयारी शहरात भाजपने इतर मागासवर्गाच्या 30 महत्त्वाच्या आणि मतदानात अव्वल असलेल्या जातींसोबतची वीण अधिक घट्ट केली आहे. शहरात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या 52 वसाहती प्रचारासाठी भाजपकडून निवडण्यात आल्या आहेत. विरोधकांनी संविधान बदलाचे नरेटिव्ह सेट केल्याने लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजप 52 वसाहतींमध्ये जाऊन केंद्र व राज्याने केलेल्या कामांचा पाढा वाचत आहे. शहरातील बुद्धिजीवी, नवमतदार, महिला, युवक आदींचे संमेलन घेत आहे. सुरक्षा, शिष्टाचार लेखाजोखा, साहित्य, होर्डिंग प्रमुख अशा 39 समित्या बनवण्यात आल्या होत्या,असे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article