काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाक्याच्या आतषबाजीत लहान मुलगा गंभीर जखमीFile Photo
Published on
:
16 Nov 2024, 9:59 am
Updated on
:
16 Nov 2024, 9:59 am
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सध्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. यावेळी एक ९ वर्षांचा मुलगा या आतिषबाजीत गंभीर भाजून जखमी झाला. १३ नोव्हेंबर रोजी कामराज नगर येथे काँग्रेसच्या प्रचार रॅली दरम्यान ही घटना घडली.
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी फटाक्यांची फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. काँग्रेसच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी अनुमला रेवंत रेड्डी धारावीत आले होते. यावेळी ९ वर्षांचा मुलगा जखमी झाला. या मुलाच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला फटाक्यांच्या स्फोटामुळे गंभीर इजा झाली आहे. या जखमी लहान मुलावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.