धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण:कामाच्या मुद्द्यावर लढावे, आमदार बच्चू कडूंचा भाजपवर प्रहार

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात परिवर्तन आघाडीने देखील आपले उमेदवार उतरवले आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून धनंजय गावडे यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी विरार येथे सभा घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाती धर्माच्या नावावर निवडणूक लढवणे हे नामर्दाचे लक्षण असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे. या भागात अद्याप पाण्यासाठी संघर्ष विरारच्या सभेत बोलताना बच्चू कडू यांनी वसई विरार येथील स्थानिक आमदारावर तसेच सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, देशाच्या आर्थिक राजधानीच्या बाजूला असलेल्या या भागात अद्याप पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे दुर्दैव आहे. नालासोपारा विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर गटासाठी इतर उमेदवार मॅनेज केले गेले आहेत. ते एक्का-दुकी आहेत, त्यांनी प्रहारचा उमेदवार धनंजय गावडे याला खरी लढत देणारा उमेदवार म्हणले आहे, असे बच्चू कडू म्हणाले. धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण पुढे बोलताना बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, धर्म हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. केंद्र आणि राज्यात असताना धर्म जातीवर राजकारण करणे योग्य नाही. येथे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना 'बटेंगे तो कटेंगे' असे म्हणणे योग्य नाही. जनता आता जागरूक झाली आहे आई या व्यवस्थेविरोधात आवाज उठवत असल्याचे बच्चू कडू म्हणाले. धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण आहे. भाजपने आपल्या कामावर निवडणुका लढवाव्यात, अशी टीका कडू यांनी केली आहे. गरिबांना रेशन दुकानातून स्वस्त कांदा द्याव बच्चू कडू म्हणाले, निवडणूक आयोग हा लोकशाहीचा आत्मा आहे, परंतु सध्या तो पक्षपातीपणा करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या घटनेवरून हे स्पष्ट होते. पुढे ते म्हणाले, गरिबांना रेशन दुकानातून स्वस्त कांदा द्याव, अशी मागणी त्यांनी केली. सरकार महागाई वाढवून मिळालेली रक्कम परत देत आहे, असे म्हणत त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article