Parbhani: बँकेचे कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

2 hours ago 1

परभणी/पाथरी(Parbhani) :- सततची नापिकी आणि बँकेचे असलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकर्‍याने लाकडी आडुला गळफास घेवून आत्महत्या(suicide) केली. ही घटना शनिवार १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील विटा बु. येथे उघडकीस आली. या प्रकरणी आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकस्मिक मृत्यूची नोंद

नारायण जयवंता हारकाळ असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत मयताचा मुलगा माणिक हारकाळ यांनी पोलिसात खबर दिली आहे. १५ नोव्हेंबरला रात्री सर्वजण नेहमी प्रमाणे झोपी गेले. नारायण हारकाळ हे घरासमोरील ढाळजामध्ये झोपलेले होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास खबर देणार यांची आई झोपेतून उठल्या असता त्यांना नारायण हारकाळ यांनी लाकडी आडुला दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने इतरजण जागी झाले. बँकेचे कर्ज आणि सततची नापिकी या तणावात नारायण हारकाळ यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. याबाबत पाथरी पोलिसात आकस्माक मृत्यूची(Death) नोंद करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article